मित्रा , चर्चेचा विषय छान आहे पण जागा चुकला आहेस .
इथे कुणाला खास अशी आपुलकी नाहीये या विषयी !
मराठी च प्रेम असणारे मराठीचं एकसुरीकरण(पुणेरीकरण) करण्यात व्यस्त आहेत ,
पुण्यात भय्याने पसरलेले हात पाय त्यांना दिसत नाहीत शिवाय परप्रांतियांमुळे गुन्हे वाढत नाहेत असे ही काहींचे ठाम मत आहे .
शिवसेना येथे चेष्टेचा विषय आहे , ज्या घाणाणाती भाषेत अग्रलेख लिहून अत्र्यांनी , भाषणे करून बाळासाहेबांनी मुंबै महाराष्ट्रात राखली , त्या भाषेला " शिवसेनट " असे उपहासात्मक नाव देण्यात आले आहे ! ( तेही येथील एका ज्येष्ठ साहित्यिकाकडून !
)
असो . मी येथे या विषयावर बोलणे सोडून दिले आहे .
तुका म्हणे "उगी राहावे । जे जे होईल ते ते पाहावे " ॥