तिसऱ्या प्रयत्नात बेला सर्वांगसुंदर झाल्याबद्दल अभिनंदन.  आता तुमच्या लाडवात सुधारणेला वाव नसेलच. पण कष्ट कमी करण्यासाठी एक उपाय आहे. तो म्हणजे बेसन तुपावर न भाजता कोरडेच भाजणे आणि जवळजवळ भाजत आल्यावर योग्य त्या प्रमाणात तूप घालून थोडे भाजणे. लाडवाच्या चवीत काहीच फरक पडत नाही. कोरडे बेसन भाजायला सोपे पडते व हात कमी दुखतो!
(मी अमराठी मुलखात रहात असल्याने  दिवाळीत शेजाऱ्यापाजाऱ्यांना व कार्यालयातही फराळाचे वाटते. गेली कित्येक वर्षे मी दर दिवाळीत दोन किलोचे बेसन लाडू करते. पूर्वी हात खूप दुखायचा पण अनुभवातून हा शोध लागल्याने आता तेवढा त्रास वाटत नाही. साध्या भट्टीत बेसन भाजले तर हात दुखण्याचा प्रश्नच येत नाही पण वेळ जास्त लागतो. सूक्ष्मतरंगलहरी भट्टीत भाजून पाहिले नाही!)