अरे मित्रा असे बरेच लोक आहेत ज्यांना या विषयावर बोलायचं असतं, पण लिहावं कसं ? किंवा आपल्याला लिहिणं जमेल का अश्या अनेक कारणांनी लिहीत नाही.
मराठी च प्रेम असणारे मराठीचं एकसुरीकरण(पुणेरीकरण) करण्यात व्यस्त आहेत,
पुण्यात भय्याने पसरलेले हात पाय त्यांना दिसत नाहीत शिवाय परप्रांतीयामुळे गुन्हे वाढत नाहित असे ही काहींचे ठाम मत आहे.
१००% सहमत. पण तसे लोक आहेत म्हणून तर भैय्यांनी हातपाय (आता तर पूर्ण अंग) पसरले आहेत. त्यावेळी शिवसेना नसती तर मुंबईत मोजायलासुद्धा मराठी माणूस दिसला नसता. (हे पुण्यात होईल, तेव्हा फुकाच्या चर्चा बंद होतील ? ) पण दुसऱ्याने फसवले तर त्याचे वाईट वाटत नाही, पण आपल्यांचे घाव हृदयावर बसतात. तसाच शिवसेनेचं झालं. नशीब आपलं की मनसे जन्माला आली नाहीतर काँग्रेसने मराठी लोकांना विकून खाल्ले असते.
असो. लोक काय म्हणतात हे बघत बसलं तर कसं चालेल. आपण आपलं काम करायलाच हवं. मनसे-सेना एकत्र येतील, पण एक पक्ष होवू शकणार नाही. कारण मूळ कारण म्हणजे बडवे बाजूला व्हायला हवे. ते झालं तर महाराष्ट्राचं कल्याण होईल.
आता राज्यसभेत मराठी माणूस (मग तो भलेही परप्रांतीयांचा बाजूने बोलणारा असेल) पाठवा असा दट्ट्या काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे येतोय हे मनसेचं आणि मराठी माणसांचं यश... यात सध्यातरी समाधान मानायचं.