शिवसेना येथे चेष्टेचा विषय आहे, ज्या घाणाणाती भाषेत अग्रलेख लिहून अत्र्यांनी, भाषणे करून बाळासाहेबांनी मुंबै महाराष्ट्रात राखली, त्या भाषेला " शिवसेनट " असे उपहासात्मक नाव देण्यात आले आहे! ( तेही येथील एका ज्येष्ठ साहित्यिकाकडून!    )

अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राकरता घणाघाती लेख लिहून, भाषणे करून प्रचार केला हे मान्य. पण बाळासाहेब ठाकऱ्यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले योगदान नेमके काय आहे? या विषयावर बरेच वाचन करूनही त्यात बाळासाहेबांचा सहभाग असल्याचे कुठेही वाचले नाही. एसेम जोशी, नानासाहेब गोरे, अत्रे, डांगे वगैरे नावे प्रमुख होती. आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लिहिलेला एक लेख वाचला आहे. सी. डी. देशमुखांनी त्यासाठी राजीनामा दिल्याचेही माहिती आहे. पण बाळासाहेबांनी काही केले असे वाचले नाही.

नाही म्हणायला १९८३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनी "केंद्राचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे" अशी पुडी सोडून दिली तेव्हा शिवसेने आक्रमक भूमिका घेतली आणि  मुंबई महानगरपालिकेवर ताबा मिळवला. पण केवळ त्यामुळेच मुंबई महाराष्ट्रात राहिली असे वाटत नाही. एक तर ही फक्त अफवाच असावी, ती शिवसेनेच्या पथ्यावर पडली इतकेच.

विनायक