उत्खनन!
डॉ.पां. स. खानखोजे यांचे चरित्र 'नाही चिरा नाही पणती' या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. लेखिका श्रीमती वीणाताई गवाणकर या आहेत. ह्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्याही निघालेल्या असाव्यात; कारण २५-३० वर्षांपूर्वी हे पुस्तक अतिशय लोकप्रिय होते. ह्याच लेखिकेचे 'एक होता कार्व्हर' हे पहिलेच पुस्तक बहुधा(चू.भू. द्या. घ्या. ) 'माणूस'मधून प्रसिद्ध झाले होते आणि नंतर त्याची पुस्तकावृत्ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्याच्या सुमारे २० आवृत्त्या निघाल्या असाव्यात.
'नाही चिरा नाही पणती' मध्ये ग़दर चळवळीविषयी पुष्कळ माहिती आहे. बहुधा इतकी एकगठ्ठा माहिती मराठीमधेतरी इतरत्र नसावी.