प्रसाद,

ऊहापोहासाठी घेतलेला विषय खूप छान आहे.
(केवळ! ) चर्चेसाठी माझ्याही खूप जिव्हाळ्याचा विषय आहे हा!

बाकी, तुम्ही आचार्य ओशो रजनीश यांचे अवाढव्य लेखन, (त्यांनी वेळोवेळी दिलेली व  नंतर ग्रथित झालेली प्रवचने) काही प्रमाणात तरी वाचले असेलच.  :)  ज्यांना अध्यात्माविषयी काही जाणून घ्यायचे आहे, त्यांनी या 'महासागरा'त डुंबण्याचा अनुभव घ्यायलाच हवा.

मतांध

हा शब्द फार आवडला.

मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मेंदुच्या कोणत्या तरी कोपऱ्यात चालू असलेल्या रासायनिक प्रक्रियांची  प्रतिक्रिया.

- हेही अगदी खरे आहे...

तूर्त, वेळेअभावी एवढाच प्रतिसाद देत आहे... नंतर निवांतपणे सविस्तर प्रतिसाद नक्कीच देईन...

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

छान विषय चर्चेला घेतल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.
या विषयावर तुमचे पुढील विचार वाचायलाही खूप आवडेल...