राजकमल चौकात राजलक्ष्मी टॉकीजजवळ एक पाईनॅपल शेकचं दुकान आहे. नाव विसरलो.
तसेच राजकमल चौकातील दुग्धपूर्ण (मिल्क शेक व इतर शेक्स व लस्सी) अहाहा... (हे मी माझ्या पूर्वीच्या प्रतिक्रियेमध्ये लिहिले होते. ) विजयभाऊ, दुकानाचे नाव विसरलात, पण शेक ची चव विसरली जाऊ शकणार नाही याबाबत पूर्ण खात्री.
कोरियन आमंत्रणाबद्दल आभार, परंतु मी शाकाहारी असल्याने वरील पदार्थांचा आस्वाद घेऊ शकणार नाही. सध्या मी फ्लोरिडा मध्ये राहतोय. येथील क्युबन लोकांची सागरी पदार्थांची भोजनालये फार आवडतात सामिषं आहार असणाऱ्या भारतीय बांधवांना.
अमेरिकेतील भारतीय भोजनालयातील पदार्थांना ती सर येत नसली तरी पायोनिअर रस्ता, आर्टेशिया कॅलिफोर्निया व म. गांधी मार्ग, शिकागो येथे गेलं की जवाहर रस्त्यावर गेल्यासारखं वाटतं.