उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:



लहानपणी नेहमी मला एक चिंता भेडसावायची. आई किंवा बाबा या दोघांपैकी कुणी एक "बिन-तात्पर्याच्या गोष्टीत शिरलं तर?". आता ही गोष्ट म्हणजे काय हा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर कुठल्याही मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात अशा गोष्टी ऐकायला मिळतात. या गोष्टीचा नेमका हेतू नेहमी धूसर असतो. पण गोष्ट म्हणून तिचा दिलखुलास असा आस्वाद काही केल्या घेता येत नाही. हेतू स्पष्ट नसला तरी ती गोष्ट कुठेतरी टोचत राहते, आणि हे आख्यान बंद झालं तर आपल्या आयुष्यात खूप सकारात्मक फरक पडेल असंही वाटत राहतं मनाच्या एका कोप-यात. लहानपणी आई किंवा बाबांबरोबर एकटं बाहेर जाताना ...
पुढे वाचा. : बिनतात्पर्याच्या गोष्टी