एका अमेरिकन माणसाने भारताला भेट दिली आणि सर्व भारत हिंडून तो अमेरिकेत परत गेला. तेथे गेल्यावर त्याला तू काय पाहिले काय आवडले विचारल्यावर त्याने सगळी यादी दिली शेवटी त्याला प्रश्न विचारला गेला, "भारतीय माणूस कसा वाटला ? "यावर त्याने उत्तर दिले"भारतीय ? तिथे मला भारतीय माणूस दिसलाच नाही ज्याला ज्याला विचारले तो एक तर महाराष्ट्रीय, वा गुजराती वा तमिळ वा बिहारी वा बंगाली वा असाच आणखी काही होता पण आपण भारतीय आहोत असे मात्र कुणालाच वाटत नव्हते"