भाषानिष्ठा पाळू नये असा काही नियम आहे का?
अहो, विज्ञानासारखेच भाषेचे (लिखाणाचेही) काही नियम आहेत.
साध (साधं), सोप्प (सोप्पं), कस (कसं)
(कंसातील लिखाण योग्य) असं लिहा की जरा...
आणि संस्कृत तर मुळीच चुकीचं लिहू नका. अर्थ पार बदलतो.
हतो वा 'प्राप्स्यसि' स्वर्गम्।
भस्मीभूते च देहे च पुनरागमनं कुतः ?
>तुम्ही फक्त "आहात" म्हणजे नक्की काय?
'असणे' ह्या क्रियापदाच्या अर्थाचं ज्ञान होणं असा अर्थ आहे का? का काही वेगळा फील आहे? (फील सुद्धा विज्ञानाच्या भाषेत, मेंदूतील काही तरी रासायनिक प्रक्रियाच नाही का.. )
ग्रॅव्हिटी- अर्थात गुरुत्वाकर्षण- दिसतं का हो? पण तरीही ते आहे ह्यावर विज्ञाननिष्ठही विश्वास ठेवतात च ना?
गुरुत्वाकर्षणाबद्दलही असं म्हणता येईलच की, 'बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल'.
आणि अध्यात्माचा स्वीकार केल्यावर स्मशानशांतता येते? काय बोलणार ह्यावर?
असो... चालू द्या.