येथे फक्त ५ ज्ञानेंद्रिये यांना अनुभवता येणारे अनुभव प्रमाण मानले जातील.

डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, या पाच ज्ञानेंद्रियांनी आपल्याला फक्त बाह्य जगाची जाणीव होते. पण माणसाचे अनुभवविश्व फक्त या पाच ज्ञानेंद्रियांनी येणाऱ्या अनुभवांपुरते मर्यादित नसते. शरीराच्या गरजा व त्याची अवस्था (उदाहरणार्थ तहान लागणं, भूक लागणं, डोकं दुखणं,) या गोष्टी या पाच इंद्रियांनी जाणवत नाहीत. त्यासाठी दुसरी व्यवस्था असावी. तसेच भावभावना जाणवायलाही आणखी निराळी व्यवस्था असावी. हे अनुभव खोटे असं म्हणता येत नाही. कदाचित मन ही संकल्पना अशा ठिकाणी उपयोगी पडत असावी.