या एका शब्दावर येवून विज्ञान थांबतं.

हो. पंचेंद्रीये कसे ज्ञान गोळा करतात ते विज्ञानाला समजते.
हो. पंचेंद्रीयांचे विद्युत संदेश रासयनिक माहितीत भाषांतरीत होतात, त्याचेही विज्ञान व्यवस्थित निरुपण करू शकते.
सृष्टीतील अनेक अनुभवांचे, जवळ जवळ सर्व मानवी क्रीयांचे निरुपण करणे विज्ञानाला आज नाहितर उद्या शक्य होईलच.

पण एका ठिकाणी येऊन थबकायला होते. माझ्या मेंदूत जी काही रासायनिक/विद्युत/जैविक प्रक्रीया चालू आहे, त्यामुळेच मला स्वत्वाची जाणीव होते? आता यावर कसाकाय विश्वास ठेवायचा ?
म्हणजे बाजूला पडलेला दगड आणि मी यात फक्त क्लीष्टतेचाच काय तो फरक आहे! बाकी काही नाही! यावर कसा विश्वास ठेवायचा? (खरतर मी सोडून दुसरा कोणताही प्राणी आणि दगड यात फरक नसायला माझी काही हरकत नाही. पण मी?, बाकी सर्व माणसे एका उच्च दर्जा च्या संगणक आज्ञावली प्रमाणे वागत असतील, माझे काहीही म्हणणे नाही. पण मी  आहे! ) कारण असणे, हे फक्त स्वतःच्याच बाबतीत जाणवण्यासारखे आहे.. असो विषय फारच क्लीष्ट आहे..

पण प्रसाददादा, एक गम्मत लक्षात आली का? विज्ञान आणि अध्यात्म यांचे एकच मत आहे, ते म्हणजे अद्वैत! विज्ञानाचे जडाद्वैत, तर अध्यात्माचे सुक्ष्माद्वैत. पण एकदा अद्वैताची शक्यता मान्य केल्यावार जड की सुक्ष्म हा प्रश्नच उरत नाही.