दुसरं म्हणजे गड्डा हॉटेल - हे हॉटेल गड्ड्यात आहे म्हणून त्याचं नाव तसं पडलं.
आहे नाही होते बहुधा!  इथली दही मिसळ आठवते आहे.

तिसरं म्हणजे रघुवीर. हे थोडंसं एका बाजूला आहे. चौकातून २~३ मिनिट लागतील. मात्र कधी अमरावतीला गेलात तर इथली दही-कचोरी आणि शेगाव कचोरी खायला विसरू नका.
राजापेठ कोतवालीच्या बाजूला का? हो चांगले आहे. अमरावतीला ह्या समोशांवर, कचोरींवर, सांबारवडींवर चिंचेची चटणी, दही व वर पातीचा कांदा टाकतात. एकंदर अमरावतीला चाट, कचोरी, समोसे, दहीवडे इत्यादी पदार्थ चांगले मिळतात.

अमरावतीतले गोदुग्ध सागर आठवते आहे. कुठल्यातरी थेटराच्या बाजूला आहे.  थेटराचे नाव विसरलो. तिथेच आसपास दिलखुश मिठाई भंडार होते. हे दिलखुश बंगाली मिठायांसाठी प्रसिद्ध होते. नागपूरचे प्रसिद्ध आनंद मिष्टान्न भंडारवाले दिलखुशच्या नात्यातलेच.

अमरावतीच्या पालेकर बेकरीची उत्पादनेही चांगली असायची. आता ती बेकरी सिंधी बांधवांनी घेतली आहे असे कळते. तसेच राजकमल चौकात उन्हाळ्यात एक प्रचंड माठ घेऊन कुल्फीवाला बसला असायचा.