माहिती आवडली आणि पटली.  पाणिनी  कधीकधीच एकाक्षरी शब्दांना अनुबंध जोडतो, हे माझ्याही लक्षात आले होते.  त्याचे कारण मात्र माहीत नव्हते. आता थोडेफार समजले. डु आणि ञ् या अनुबंधांचे वर लिहिले आहेत तसे अर्थ (त्रि लावता येणे-न येणे  आणि आत्मनेपदी कृ चा वेगळा उपयोग इ) असण्याबद्दल कुणा ग्रंथकाराने, किंवा पाणिनीवरच्या  कुणा भाष्यकाराने लिहिले आहे हे समजले, तर पाणिनी समजायला किंचित सोपा जाईल, असा संशय वाटतो आहे.--अद्वैतुल्लाखान