गोंधळात पाडणारा लेख
शांत देवळात ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा अंतर्ध्वनी ऐकू शकता, त्याप्रमाणे इतर कोठे येतो तरी का ऐकू हा आवाज?
शांत? आणि देवळात?
कोणत्याही निसर्गरम्य स्थळी गेले की माझी स्तिमित पुतळी होते
आता हे आणि काय मग?
सुरवातीच्या 'सच्चाई' या शब्दापासून सगळेच खटकले. गंगाधर गाडगीळांच्या भाषेत सांगायचे तर 'धपापत्या छातीच्या लेखिकेने' लिहिलेला लेख वाटला. शब्दबंबाळ आणि घाईघाईने लिहिल्यासारखा. लेखिकेच्या आजवरच्या लिखाणाशी विसंगत.
स्पष्ट प्रतिसादाबद्दल क्षमस्व. 'अहो रुपम, अहो ध्वनी' हे किमान मनोगतावर तरी होऊ नये.