मित्रा , ज्ञानाचे ४ स्तर आहेत
ज्ञान , विज्ञान , तत्त्वज्ञान आणि आत्मज्ञान .
येथे जी चर्चा चालू आहे त्यात आत्मज्ञान हा केंदबिंदू आहे . कृपया केंद्र
बिंदू इतरत्र सरकवू नये .
"बुद्धी" हे सर्वश्रेष्ठ ज्ञानेंद्रिय आहे. >>> मित्रा ,बुद्धी हा विज्ञानाच्या क्षेत्रातला विषय आणलास असो ,
बुद्धी या गोष्टीचे भौतिक अस्तित्व दाखवता येत नाही , या वरून ती इंद्रीय
नाही हे सरळ आहे ! मित्रा बुद्धी म्हणजे आजवर साठवलेल्या ज्ञानाचा वापर
करून , आत्ता समोर असलेल्या ज्ञानाचे अर्थ व अनुमान काढणारी पद्धती /
प्रक्रिया !!
जे विश्वाच्या सुरूवातीला नव्हते आणि शेवटीही नसेल ते आताही नाही" :विश्वाची रचना उत्पत्ती
विनाश ,तत्वज्ञानाच्या क्षेत्रातला विषय आणलास !! आपण तत्त्वज्ञानावर
स्वतंत्र चर्चा करुयात का ??
गौडपादाचार्यांना सविनय शि. सा. न .
" कोणी तरी थोर पुरुष म्हणून गेला म्हणून अथवा तुमचा धर्म/ धर्मग्रंथ
सांगतो म्हणून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका , तुम्ही तुमच्या
सत्सतविवेक बुद्धीने ती गोष्ट पडताळून पाहा , तुम्हाला त्याचा अनुभव
आल्यावरच त्यावर विश्वास ठेवा " - स्वामी विवेकानंद .