योग्य मुद्दा उचललास मित्रा ,
१) माझ्या सुमारे ५०० शब्दांच्या लेखात ४-५ भाषा चुका आहेत , अर्थात मी ६ सिग्मा पासून फक्त ०.७३% दुर आहे ! ( मनोगतावरचे सर्वलेखन मोजल्यास कदाचित मी ६ सिग्मा प्राप्त ही केले असेल !! )
२) आता तुच मला सांग भाषेची उत्पत्ती कशी झाली ?
अवघड आहे , चल सोड , सांग का झाली : संभाषण करायला , विचारांची देवाण घेवाण करायला बरोबर ? जर मी लिहिलेल्या लिखातून तुला माझा विचार कळत असेल तर शुद्ध काय अशुद्ध काय ? भाषेचा मुळ उद्देश साधला गेला बस्स!!
३) अर्थात गरज आहे तिथे शुद्ध लिहिण्याची काळजी मी घेतोच , जर चिंता लिगायच्या जागी चिता अथवा चीता लिहित असेन तर जरुर बोला , अन्यथा नको ही विनंती . अध्यात्मातही ( मग ते खर खोट कस का असेना ) " शब्द " हा पंच विषयातला पहिला विषय म्हणला आहे , त्यात अडकू नकोस !!
४) ग्रॅव्हीटी : परत एकदा सुडो-सायंन्स !! मी जेव्हा दाखवा असे म्हणतोय तेव्हा त्याचा अर्थ सिद्ध करा असा आहे ( गणितात शो दॅट आणि प्रूव्ह दॅट समान अर्थाने वापरतात ) आणि मी ग्रॅव्हीटी " दाखवू " शकतो .