वितंडवाद आणि मूर्खपणा एकाच अर्थाने वापरतात. (त्यामुळे, हा माझा शेवटचा प्रतिसाद)
(तुमचा तो शास्त्रीय मुद्दा, आणि आमची ती पळवाट असे काही आहे का? विज्ञाननिष्ठही जर तुमच्या भाषेत सुडो-सायंन्स चा आधार घेतात आणि वापर करतात, तर ते बरोबर, आणि मन, आत्मा ह्या गोष्टी चूक? हा बरा न्याय आहे. आमचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं...???)
(एक नीतिशतकातला श्लोक आठवलाः तुला लागू होतो असे नाही, पण आठवला म्हणून लिहितोय. )
अज्ञः सुखमाराध्यः, सुखतरमाराध्यते विशेषज्ञः ।
ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि नरं न रञ्जयति ॥
अर्थः जो अज्ञ आहे, त्याचे समाधान चटकन् करता येते. जो विशेषज्ञ आहे, त्याचे समाधान त्याहूनही चटकन् करता येते (कारण आपण जे म्हणतोय ते कळण्याची त्याची योग्यता असते.) परंतु, जो ज्ञानाच्या लवाने दुर्विदग्ध झालेला आहे (अर्थात सोप्या शब्दात, अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाला आहे) त्याचे समाधान खुद्द ब्रह्मदेवही करू शकत नाही.
आणि अध्यात्मात जसा शब्द पहिल्यांदा आहे, तसाच नीतिशतकात हा श्लोकही योगायोगाने (तू योगायोगही मानत नसशीलच)पहिलाच आहे (मंगलाचरणानंतरचा)
चालू द्या बाकी.
(अवांतरः ६ सिग्मा वगैरे काही न कळणारा मी, पण तुझ्या, ''कदाचित मी ६ सिग्मा प्राप्त ही केले असेल '' ह्या वाक्यातला 'कदाचित' हा शब्द 'निश्चित' मध्ये बदलला तर मला अत्यानंद होईल. )