काल खरं तर हा लेख मी एका तंद्रीत टंकला आणि पोस्ट केला.... एरवी तो लेख पोस्ट करायच्या अगोदर दोनदा-तीनदा तरी वाचते, तेही वाचले नाही. पण तरीही ज्यांनी लेख आवडला अशी पावती दिली त्यांचे सर्वांचे मन:पूर्वक आभार!
आता राहिली परखड प्रतिसादाची गोष्ट! तर संजोप राव, विभव व शरदजी.... तो तर लिखाणाचाच एक भाग झाला ना? उलट तुम्ही त्यातील कच्चे भाग लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! आज मलाही लेख वाचताना जाणवले की मी भरपूर उड्या मारल्या आहेत! नेहमीच्या शैलीतील हे लिखाण निश्चितच नाही. पण त्यातला आशय मात्र अगदी प्रामाणिक आहे! 
टग्या : विहंगमचा अर्थ तुम्ही म्हणता तोच आहे.