तो आला तो गेला हे मी नुसते बोलत असते
भेटला मला तो नाही हे कोठे सांगत असते?

कोणाला टळले आहे गडगडणे उंचीवरुनी
तो तारा आहे कळले , मी जपून वागत असते

सर्वस्व कुठे नेले ते मज सांगितले नाही पण ..
(वार्‍याला फूल कधी का दिशा विचारत असते!)              ... विशेष आवडले, मक्ताही  सुंदर !