नरेंद्र,
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. परंतु, मला वाटते, माझ्या प्रतिसादातील उपरोधिक स्वर तुम्हाला जाणवला नसावा.
बँक ही संकल्पना आणि शब्द गेल्या निदान १०० वर्षांपासून आपल्याकडे आहे. गेल्या काही वर्षांत अगदी खेडो-पाड्यात पोचलेल्या बँकांमुळे हा बँक हा शब्द (ब्यांक ह्या उच्चारासहित) समाजाच्या सर्व थरात वापरला जात आहे. तेव्हा त्याला प्रतिशब्द शोधण्याचा खटाटोप व्यर्थ आहे हेच मला सुचवायचे होते.