असाच प्रश्न नेहमी पडतो. प्रचिती शिवाय कसा काय विश्वास बसणार? बरं, ती सुद्धा अशी खणखणीत हवी की इतर तर्क, सबबी, शक्याशक्यता यांना स्थान असू नये... मग आपण पूर्ण शरणागती पत्करायला तयार आहोत. कारण यात कोणी चूक बरोबर असा प्रश्न नाहीच मुळी... विचार धारा आणि शुद्ध सोलीव सत्य याचा आहे!

लोकांचे मात्र नवल वाटते... केवळ एकाला आला अनुभव म्हणून त्याच्या सोबत अजून १०-१५ जण अनुयायी होतात!