एखाद्या प्रसिद्ध कवितेतला  एखादा शब्द घेऊन ते ते नाव त्या त्या वृत्ताला देतात.

असेच काही नाही. ही घ्या मात्रावृत्तांची नावे :

आर्या, उद्धव, गीति, उद्गीति, उपगीति, औपच्छंदसिक, कटिबंध(कटाव), गुणि(स्वैरगति), पद्‌म, पन्‍ना(रेवती), पादाकुलक, प्रविसूर्यकांत, बालानंद, भूपतिवैभव(मालिबाला), मंजरी(लीलारति), मोहिनी, चंद्रकांत, सूर्यकांत, साकी, दिंडी, धवलचंद्रिका, वैतालीय, शारदा. वगैरे वगैरे अनेक. (यांतले चंद्रकांता हे नांव तेवढे झुंझारराव नाटकातल्या 'चंद्रकांत राजाची कन्या..' वरून ठेवलेले दिसते आहे.) काही मात्रावृत्तांना जाति‌‌ म्हणतात.
याशिवाय, मराठीत पोवाडे, भूपाळ्यांसारखी छंद नावाची मात्रावृत्ते आहेत.--अद्वैतुल्लाखान