व्याकुळ होतो आठवणींनी प्राण कितीदा...
 ठेवलीस रे तू याची पण जाण कितीदा?

श्रावण आला मात्र कुठे आलीस तशी तू...
  कोरडीच का वैशाखासम सांग अशी तू?

...
हीच लय घेऊन (मात्र वेगळ्या शब्दक्रमात) आणखीही कुणी कुणी कविता रचेल


ह्या रचनेत केवळ मात्रांची संख्या एवढेच साम्य नाही. तर मात्रांचे गट समान आहेत हे ते साम्य आहे.
आठ आठ मात्रांचा (पद्म नावाचा? ) गण होतो तसे येथे तीन तीन गण एका ओळीत आहेत. ह्यातल्या आठ मात्रांच्या अंतर्गत लघुकुरुक्रम कसाही ठेवता येतो. मात्र गणक्रम खंडित झाल्यास ते वृत्त ते वृत्त राहणार नाही

वरील वृतात
गागागागा - गागागागा - गागागागा
किंवा
गाललगागा - गाललगागा - गाललगागा
किवा
गालगालगा - गागागालल - गाललगागा
अशा अनेक प्रकारे ओळी लिहिता येतील (तुम्ही लिहिल्याच आहेत.)

मात्र

गागागा लगाल गागागा गागागागा
अशी ओळ लिहिता येणार नाही. (संपूर्ण ओळीत मात्रांची संख्या तितकीच असूनही. आठ आठ मात्रांचे गट/गण न करता आल्याने)

म्हणजे हे जे वृत्त तुम्ही निवडले आहे त्याची व्याख्या 'एका ओळीत आठ आठ मात्रांचे तीन गण' अशी करावी लागेल.

माधव ज्युलियनांच्या पुस्तकात पाहिल्यास अशा वृत्ताला एखादे नाव दिलेले असेलही.
(नसल्यास तुम्ही 'व्याकुळ' किंवा 'श्रावण' हे नाव आधी कोठे कुणी वापरलेले नसल्यास वापरायला लागावे!)

मग या मात्रावृत्तांना कोण(कोण)त्या नावांच्या साच्यात बसवायचे?

वर म्हटल्याप्रमाणे आठ आठ मात्राचे तीन गट/गण हा तो साचा आहे. तो तोडला की वृत्त बदलले.