आजकाल कोण एवढं पोथ्या - पुराणं तपशीलवार वाचायला जातंय??? अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेलेच अनेकजण दिसतील आजूबाजूला -- लेखी आधारापेक्षा कथित, चर्चित गोष्टींवर विश्वास ठेवणारे! त्यांना त्या पोथ्यांमध्ये काय लिहिलंय ह्यापेक्षा आपलीच टिमकी गाजवायची खुमखुमी असते, आणि त्यापायी भरपूर पोकळ चर्चा झडतात - अगदी क्रिकेटच्या चर्चेसारख्या - ज्यातून फारसे काहीही साध्य होत नाही व फुकाचा टाईमपास होतो.
वास्तवात भारतात चाललेल्या संशोधनांवर असे किती लोक तुम्हाला चर्चा करताना दिसतील? अगदीच थोडे! आणि त्यातही ''हॅ, त्यात काय एवढं? '' म्हणणारेही जास्तच भेटतील! त्यामुळे ''आम्हीच श्रेष्ठ'' वगैरे हा फक्त एक मनोरंजनाचा लोकप्रिय प्रकार आहे ज्यातून फलित शून्य आहे, मात्र फुकाचा गर्व तर भरपूर दिसेल.
असो. इतिहास-पुराणांचा-पोथ्यांचा आधार घेऊन अजून किती वर्षे आपण ''आम्हीच श्रेष्ठ'' म्हणणार हे सांगतानाचा आपला परशुरामाच्या पराक्रमाचा पोथ्यांपुराणांत दिलेला दाखला मात्र लेखाच्या मूळ कल्पनेलाच विरोधाभासी वाटला!