मेंदू आहे हे ज्याला कळतंय तो कोण आहे? माणसाची सर्वात मोठी हीच तर चूक होतेय, मेंदूला कळत नाही, मेंदू मार्फत तुम्हाला कळतंय.
डोळ्यांना दिसत नाही, डोळ्यांतून तुम्ही बघताय! नाहीतर डोळे नसणाऱ्याला दिसत नाही हे कसं कळलं असतं? हा कळणारा जो आहे तो इंद्रियांपेक्षा वेगळा आहे. तो बुद्धीच्याही पेक्षा वेगळा आहे कारण सारे आकलन मेंदूत आहे, आणि त्याला आपण सर्वजण मी म्हणतो, हा मी आपल्या सर्वांचा एक आहे, हे अध्यात्म आहे
१००% सहमत. फक्त हे आपले ओरिजिनल विचार नाहीत, तर केनोपनिषदात अगदी हेच सांगितले आहे. डोळ्याचा डोळा, कानाचा कान कोण? वगैरे प्रश्नांचा ऊहापोह त्यात आहे.
मी अस्तित्व हाच परमात्मा मानतो. इतके सुरेख ग्रह, तारे, सूर्य, चंद्र, नद्या, समुद्र, पक्षी, संगीत, हे सर्वव्यापी आकाश, हा आपला कधीही थांबू शकेल पण ज्याची आपल्याला दखल ही नाही तो अनाकलनीय श्वास, आणि कुणीही चालवत नसताना चाललेलं हे पराकोटीचं गूढ विश्व हा परमात्मा आहे. आता यात सिद्ध करण्या सारखं काय आहे?
सहमत.
आत्मा म्हणजे तुम्ही आणि परमात्मा म्हणजे अस्तित्व, या दोन्हीत रेषेचंही अंतर नाही म्हणून अद्वैत! आणि हे न समजणं म्हणजे द्वैत आणि तेच साऱ्या कलहाचं कारण आहे.
इथे गोंधळ आहे. अस्तित्त्व एकच असेल तर आत्मा आणि परमात्मा अश्या दोन वस्तूंचे प्रयोजन काय? द्वैत हे अज्ञानाचे कारण आहे. कलहाचे कारण बहुतेक स्वार्थ असतो. हा स्वार्थ (आत्म) अज्ञानातून जन्म घेतो असे फार तर म्हणू शकू. पण काही अज्ञानी (म्हणजे आत्म - अज्ञानी) लोक निःस्वार्थ बुद्धीने काम करताना दिसतात त्यावरून हेही १००% खरे नसावे.
अस्तित्व एक आहे म्हंटल्यावर युद्ध कशाला?
युद्धाने कितीही जीवहानी झाली तरी अस्तित्त्वाला बाधा येत नाही. होता होईतो सर्वांनी शांततेने राहावे, युद्ध टाळावे कारण सर्व सजीवांची त्यांचे देह टिकवण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. हवे तर त्यांचा तो हक्क आहे असे म्हणू. तो अबाधित राहावा म्हणून युद्ध नको असे आत्म - अज्ञानी लोक युक्तिवाद करतात तो समजण्यासारखा आहे. पण स्वतःला निराकार समजणाऱ्या व्यक्तीने युद्ध नको म्हणावे हे समजत नाही.
एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे जिथे आपण उपनिषदातले विचार सांगता ते तर्कशुद्ध असतात, पटतात. जिथे त्यापासून दूर जाता तिथे आपले म्हणणे पटत नाही.
विनायक