लेन = गल्ली
(किंवा बोळ असाही शब्द प्रचलित आहे)
मार्गिका हा शब्द मुंबईच्या बसमध्ये लिहिलेला असतो, तो फार छान आहे. 'कृपया मोकळ्या मार्गिकेतून पुढे सरका' असे काहीसे लिहिलेले असते, असे आठवते.
छन्न म्हणजे आच्छादित किंवा झाकलेला ली ले. जसे प्रच्छन्न म्हणजे छुपा (चू.भू.द्या.घ्या.)
त्यामुळे छन्नमार्ग म्हणजे ज्या रस्त्यावर छप्पर आहे असा रस्ता असे वाटते. लेन साठी गल्ली, बोळ किंवा मार्गिका हे बरे पर्याय वाटतात.