परिचय त्यांतल्या लंगडा भूतसह आठवला. पण त्यातलें रेलवे स्टेशन स्मरणांत नाहीं.
दुलारी कोण ते ठाऊक नसल्यामुळें त्यांतली मजा समजली नाहीं.
तेथे तर समोर शशीकपूरसारखे युकॅलिप्टसचे झाड आहे.
बाजूला हंगल नावाचे लिंबाचे लोणचे आहेच!
हें आवडलें
अंगूर आठवला. याच थीमवर म्हणजे 'कॉमेडी ऑफ एरर्स'वर दो दुनी चार हा किशोर कुमारचा कृष्णधवल चित्रपट बरीच वर्षें डब्यात राहिल्यानंतर आला होता. मीं मुंबईतल्या ऑपेरा हाऊसमध्यें पाहिला. ऑपेरा ची परंपरा म्हणून इथें सर्वांत महाग तिकीट सर्वांत पुढच्या रांगेत असे. कायमचें बंद होण्यापूर्वीं बहुधा तिथें लागलेला हा अखेरचा चित्रपट असावा.
रेलवे स्टेशन होतें कीं नाहीं आठवत नाहीं पण '२७ डाऊन' आणि 'हाफ टिकट' हे दोन चित्रपट आठवले. पैकीं '२७ डाऊन' तर १९७५च्या आसपास आलेला अविवाहित तिकीट तपासनीसाच्या जीवनावरील अप्रतिम कलात्मक कृष्णधवल चित्रपट - आर्ट फिल्म होता. बहुधा नासिरुद्दीन होता. त्यातील एक अफलातून गंमत मीं लिहीत नाहीं. कारण आपण पाहिला नसेल तर पाहातांना मजा येणार नाहीं.
असो. पुन्हां एकदां ... सुंदर लेख.
धन्यवाद.
सुधीर कांदळकर