लेख आवडला. मात्र तुम्ही ज्या चित्रपटांविषयी लिहिले आहे त्यांना एका माळेत गुंफण्यासाठी दोरी म्हणून रेलवे स्टेशनचा केलेला उपयोग तितकासा पटला नाही; प्रयोग जरा ओढून-ताणून केल्यासारखा वाटला. तसेच रेलवे स्टेशनशी संबंधित चित्रपटांवरील लेखात 'रेलवे प्लॅटफॉर्म' (१९५५) ह्या चित्रपटाची अनुपस्थिती (किंवा अनुल्लेख) प्रकर्षाने जाणवला.