१) "१००% सहमत. फक्त हे आपले ओरिजिनल विचार नाहीत, तर केनोपनिषदात अगदी हेच सांगितले आहे. डोळ्याचा डोळा, कानाचा कान कोण? वगैरे प्रश्नांचा ऊहापोह त्यात आहे."

ज्यांना सत्यं समजलं त्यांचे विचार एक आहेत आणि राहतील त्यात ओरीजनल आणि ड्युप्लिकेट असा प्रश्न नाही

२) "इथे गोंधळ आहे. अस्तित्त्व एकच असेल तर आत्मा आणि परमात्मा अश्या दोन वस्तूंचे प्रयोजन काय? द्वैत हे अज्ञानाचे कारण आहे. कलहाचे कारण बहुतेक स्वार्थ असतो. हा स्वार्थ (आत्म) अज्ञानातून जन्म घेतो असे फार तर म्हणू शकू. पण काही अज्ञानी (म्हणजे आत्म - अज्ञानी) लोक निःस्वार्थ बुद्धीने काम करताना दिसतात त्यावरून हेही १००% खरे नसावे "

आत्मा आणि परमात्मा हे दोन शब्द आहेत. अस्तित्व हा देखील शब्द आहे पण जे काही आहे ते, आकार आणि निराकार, मिळून एक आहे आणि ते न कळणं अज्ञान आहे त्यामुळे मी वेगळा आहे असं वाटतं आणि मग द्वैत निर्माण होतं. जेंव्हा या न समजण्यातून निर्णय घेतले जातात ते दुःख निर्माण करतात.

३) "...पण स्वतःला निराकार समजणाऱ्या व्यक्तीने युद्ध नको म्हणावे हे समजत नाही."

सारखी आणि सर्वांची एकच चूक होते आहे मी स्वतःला (किंवा कुणालाही) नुसता निराकार समजत नाही. आपण आकार आणि निराकार एकाच वेळी दोन्हीही आहोत पण हा बोध तुम्हाला होत नाहीये. तुम्ही स्वतःला नुसता आकार समजलात तर मृत्युतून सुटका नाही आणि नुसते निराकार समजलात तर ते वस्तुस्थितीला धरून नाही. तुम्ही सर्व लेखमाला नीट वाचा.

मला युद्ध हा मानवी प्रश्न सोडवण्याचा आदिमानवी पर्याय वाटतो कारण एकतर प्रश्न अस्तित्वात नसलेल्या सीमारेषांचा (आणि सत्तेचा) आहे, या दोन्हीही गोष्टी निव्वळ मानसिक आहेत त्या सहज सोडवता येण्यासारख्या आहेत त्यासाठी इतकी हानी गैर आहे.

५)" एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे जिथे आपण उपनिषदातले विचार सांगता ते तर्कशुद्ध असतात, पटतात. जिथे त्यापासून दूर जाता तिथे आपले म्हणणे पटत नाही."

मी कशापासून दूर जाणार? मी स्वतःशी इतका एकरूप आहे की दूर जाऊ म्हणता ते शक्य नाही. ज्या क्षणी मी काय म्हणतो ते तुम्हाला समजेल त्या क्षणी तुम्ही स्वतःशी एकरूप झाले असाल, मग तुम्हाला कळेल की गोष्ट फार सोपी होती.

संजय