अस्तित्व टिकवणे (बेसिक इंस्टींक्ट वन) आणि माझ्या समूहाचे अस्तित्व टिकेल तर मी टिकीन (बेसिक इंस्टींक्ट टू) आणि म्हणून प्रेम म्हणजे प्रजोत्पादन हा स्वतःला निव्वळ शरीर समजल्यामुळे झालेला संपूर्ण मानसिक गोंधळ आहे.
१) तुम्ही काय वाट्टेल ते केले तरी तुमचे शरीर मृत्यूच्या आधीन आहे, तुम्ही वंश वाढवा की न वाढवा त्यानी काहीही फरक पडत नाही. अशा परिस्थितीत अस्तित्व टिकवणे म्हणजे काय?
२) इतकं सगळं लिहीण्यापेक्षा फक्त एकच प्रश्न सोडवा : तुम्ही ज्याला स्वतःच अस्तित्व टिकवणं म्हणता ते तुमच्या हातात आहे का?
किमान बुद्धी असलेला माणूस सुद्धा समजू शकेल की हा श्वास कोणत्याही क्षणी बंद पडू शकतो मग अस्तित्व टिकवणं म्हणजे काय? या आधीच्या दोन्ही लेखांवर मी सविस्तर लिहीले आहे त्याला उत्तर द्यायला तुम्हाला अजून तरी जमलेले दिसत नाही. पुढचे काही लिहीण्या आधी फक्त अधोरेखीत प्रश्नांची उत्तरं द्या म्हणजे मी ज्याला संपूर्ण मानसिक गोंधळ म्हणतो तो काय आहे ते कळेल.
संजय