खरे तर इजाजत वर एक अख्खा चांगला लेख/अभिप्राय तुम्ही लिहू शकता, याची खात्रीच आहे; आणि त्याची उत्सुकतेने वाटही पाहत आहे. बाकी लेख आवडला. तुमची परिचयाची, वाचनीय शैली; वैशिष्ट्यपूर्ण, ओळखीचे शब्दप्रयोग; आणि चित्रपटांचे लेखसूत्र - सगळे आवडतेच! "रेल्वे स्टेशन" प्रमाणेच इतर सूत्रांमध्ये पावसाचाही समावेश होण्यास हरकत नसावी. मान्सूनचे आगमन होणारच आहे. तेव्हा त्या निमित्ताने पावसाच्या समान सूत्राने बांधलेल्या चित्रपटांबद्दलच्या लेखाचीही वाट बघतोच आहे :)