मनाला मागे नेणाऱ्या आठवणी आवडल्या...
बऱ्याच दिवसांनी, एवढी फळा-फुलांच्या झाडाची नावं नुसती वाचूनच मन प्रसन्न झालं.

पाऊस हलका असेल तर अळूच्या पानावर पाण्याचे थेंब जमा होतात.... ते वर्णन आवडलं.
पारिजातकाबद्दल माझाही असाच अनुभव आहे.. आमच्या गुरुजींच्या घरी, मागे अंगणात पारिजातकाचं झाड होतं...आम्ही मुलं, खाली पारिजातकाचा सडा पडलेला असूनही, ते झाड हालवून ती फुलं अंगावर घ्यायचो..

असेच अजून वाचायला आवडेल. (आणि पुढच्या पिढीलाही हे अनुभव घेता यावेत यासाठी शक्य ते प्रयत्न करायलाही आवडेल.)
शुभेच्छा !