ह्या रचनेत केवळ मात्रांची संख्या एवढेच साम्य नाही. तर मात्रांचे गट समान आहेत हे ते साम्य आहे.
आठ आठ मात्रांचा (पद्म नावाचा? ) गण होतो तसे येथे तीन तीन गण एका ओळीत आहेत. ह्यातल्या आठ मात्रांच्या अंतर्गत लघुकुरुक्रम कसाही ठेवता येतो. मात्र गणक्रम खंडित झाल्यास ते वृत्त ते वृत्त राहणार नाही

- होय. गणक्रम बदलल्यास वृत्तरचना बदलेल, हे ओघानेच आले. (मला शंका होती ती मात्रावृत्तांच्या नावांबाबत. ती कशी पडतात वगैरे... पण आता निरसन झालेले आहे. अक्षरगणवृत्तांची जशी पहिल्या शब्दावरून पडतात किंवा पूर्वसुरींनी पाडलेली आहेत, तशीच मात्रावृत्तांचीही पाडण्यात आलेली दिसतात. पण मात्रावृत्तांबाबत सरसहा पहिल्या शब्दावरूनच नाव पडेल, असे म्हणता येणार नाही, हे अद्वैतुल्लाखान यांच्या प्रतिसादावरून स्पष्ट होते. अक्षरगणवृत्तांचेही असेच आहे का, हेही आता तपासायला हवे. )
...
याच संकेतस्थळावर  '... लवकर ये! ' (२ एप्रिल २००८) या माझ्या कवितेवर तुमच्यात आणि माझ्यात यतीसंदर्भात झालेली चर्चाही आठवली. त्या रचनेत माझ्याकडून झालेल्या यतिभंगासंदर्भातील विचारणा तुम्ही केलेली होती.
...

माधव ज्युलियनांच्या पुस्तकात पाहिल्यास अशा वृत्ताला एखादे नाव दिलेले असेलही.
(नसल्यास तुम्ही 'व्याकुळ' किंवा 'श्रावण' हे नाव आधी कोठे कुणी वापरलेले नसल्यास वापरायला लागावे! )


-  हो. :)  पण त्याआधी छंदो /छन्दोरचना वाचण्याचे कष्ट घ्यावे लागतील :)

वृत्तविषयक चर्चेला तुमच्यामुळे पुन्हा एकदा उजाळा मिळाला. मजा आली. आनंद वाटला.

मनापासून धन्यवाद.