परिचय आणि चितचोर सारखा शेवट स्वामी मध्ये आहे. शबाना आझमीचे  लग्न गिरिश कर्नाडशी मनाविरूद्ध झालेले असते. तिचा प्रियकर तिच्या गावी येतो आणि ती त्याच्याबरोबर पळून जाण्याचा निर्णय घेते. रेल्वे स्टेशनवर दोघेही येतात. गाडी सुटायची वेळ होते. तो तिला चल पटकन गाडी सुटेल आता असे म्हणतो आणि पळत पळत गाडीत चढतो. शबाना आझमी विचार करत तशीच एका बाकड्यावर बसून राहते. प्रियकराबरोबर पळून जाण्याकरता तिचे मन तयार होत नाही. गाडी सुटते आणि रेल्वेस्टेशनवर गिरिश कर्नाड तिला न्यायला येतो.