नायकाचे वडील त्याच्या बहुधा कल्याणच्या घरीं येतात. घर स्वच्छ करतात. त्यांच्या लक्षांत येतें कीं आपले महान चिरंजीव अद्याप घर उघडून आंत शिरलेले नाहींत. घर रिकामेंच आहे. ते विचारतात कीं कितने कमरे है अंदर. तो म्हणतो दोन. प्रत्यक्षांत तीन खोल्या असतात.

तो घराबाहेरच कपड्यांसकट दरवाजांतल्या बांकावर झोंपे. एकमजली चाळीतल्या सार्वजनिक नळावर दंतमर्जन, स्नानादी आवरे आणि सार्वजनिक शौचकूपाचा वापर करी.

गंमत फक्त म्हणायचें. तो क्षण असा चटका लावून गेला .... आतांदेखील कुठेंतरी कळ आली. हा चित्रपट वरळीच्या सत्यम थिएटरला फक्त मॅटिनीला लागला होता. खास सुटी काढून गेलों. तिथें वीज गेल्यामुळें तिकीटाचे पैसे परत मिळाले. मग पुन्हां दुसऱ्या दिवशीं सुटी काढून गेलों तेव्हां पाहायला मिळाला. परंतु दोन दिवसांची सुटी सार्थकीं लागली.

सुधीर कांदळकर