अल्लाहचे नाव आल्यावर पुढे बसलेल्या तिघी-चौघींच्या कळ्या खुलल्या आणि त्या जरा मोकळेपणाने टाळ्या वाजवू लागल्या. बुद्धाचे नाव येताक्षणी अजून काही चेहरे उजळले. विठ्ठलाचे नाव आल्याबरोबर नऊवारी, पाचवारीतल्या, ग्रामीण भागातून आलेल्या अनेक  महिला कैदी जोषाने टाळ्या वाजवू लागल्या. जीझसचा पुकारा करताक्षणी सहाव्या-सातव्या ओळीत बसलेल्या तीन-चार आंग्ल युवती डोलू लागल्या.

चांगले, ओघवते लिखाण. थेट येरवड्यात, त्या सत्संगात घेऊन गेले.

जणू त्या काही मिनिटांमध्ये निर्व्याज समाधानाचा सुगंधी दरवळ त्यांनी अनुभवला होता!
ही  अशी वाक्ये मात्र ठेवणीतली वाटतात.

अवांतर:
'लेडिज क्लब'चे नाव ऐकल्याबरोबरच टवाळखोर डोक्यात "माझी समाजसेवा कम येरवडा पिकनिक' हे शीर्षक डोकावून गेले.