पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
धार्मिक समजुती किंवा अन्य काही कारणांमुळे देहदानाकडे अद्याप समाज मोठय़ा संख्येत वळलेला नाही. खरेतर भारतीय संस्कृतीत ‘दान’ हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे मृत्यूनंतर आपल्या देहाचा आणि अवयवांचा जर वैद्यकीय विद्यार्थी किंवा अन्य गरजूंना उपयोग झाला तर त्यासारखे दुसरे पुण्य असूच शकणार नाही. अंधाला डोळे मिळाले तर तो हे जग पाहू शकतो तर संपूर्ण देह वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोगी पडू शकतो. दान केलेली त्वचा ही भाजलेल्या व्यक्तीच्या अंगावर शस्त्रक्रियेने लावता येऊ शकते. डोंबिवलीतील ‘दधिची देहदान मंडळ’ हे गेली २२ वर्षे मरणोत्तर देहदान ...