१) अस्तित्व टिकवणे म्हणजे काय?

मी "आहे" याच मी "होतो " हे न होवू देणे  बस्स यालाच म्हणतात अस्तित्व टिकवणे!!

हा "मी आहे" म्हणजे तुमच्याच म्हणण्या प्रमाणे:

"आपण कोण आहोत या प्रश्नाच सरळ साध सोप्प उत्तर : मेंदू नावाचा एकमेव अवयव विकसीत झालेली अन त्या योगे स्वतःच अस्तित्व ( सरळ साध्या एक्झिस्टन्स या अर्थाने ) टिकवण्याचा प्रयत्न करणारी  प्राण्यांची प्रजाती"

याचा अर्थ तुम्ही देह आहात आणि या देह असण्याचे 'देह होता न होऊ देणे' म्हणजे अस्तित्व टिकवणे असा होतो हे तुमच्या लक्षात आले आहे का? हे "मी आहे" मेंदूत आहे आणि मेंदू देहाचा भाग आहे हे तुम्हाला मान्य आहे की नाही?

आता या तुमच्या विधानांना प्रामाणिक राहून : 

तुम्ही ज्याला स्वतःच अस्तित्व टिकवणं म्हणता ते तुमच्या हातात आहे का? याचं उत्तर शोधा.

एकतर देह श्वास आणि हृदय या अनाकलनीयपणे चालू असणाऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे. तुम्ही थोडा जरी विचार केलात तरी हे सूर्याचे प्रकाशमान असणे, पृथ्वीचे स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरणे, इतर ग्रहांचे त्यांच्या कक्षेत फिरणे, आकाशातले विविध हवेचे थर ज्या योगे हे वातावरण अबाधीत आहे, पृथ्वीवर पाणी आणि झाडे असणे, झाडे जगण्यासाठी इतर जीवसृष्टीचा सहभाग अशा अनेक गूढ, परस्परावलंबीत आणि समसामायिक गोष्टींवर अवलंबून आहे. तुम्ही यातले काय करू शकता की थांबवू शकता? या अस्तित्वगत सहयोगामुळे अस्तित्व एक आहे हा अध्यात्माचा बोध आहे. तुम्ही इतका वरवरचा विचार करता आहात की तुमच्या अध्यात्म म्हणजे काय हे लक्षात येणे दुरापास्त वाटते असे असताना तुम्ही अध्यात्मिक विधाने कशी करू शकता?

२) तुम्हाला अध्यात्मिक समज नसतांना, काहीही नीट न वाचता असे लिहीणे: 

"अगदी  बरोबर बोललात ,  या एका प्रश्नामुळे अध्यात्मवाद्यांचे फावते , भोळी भाबडी माणसे दैवाधीन करून तुम्ही मानवी समाजाचे हीत कसे काय करीत आहात हा प्रश्न मलातरी अजून सुटत नाही."

म्हणजे वैयक्तीक लेखन होते हे तुमच्या लक्षात आले नाही का?

३) ....काही " मानसिक  गोंधळ " ( खोपडी में केमीकल लोच्या ) आहे

हे तुमचे वाक्य आहे हे तुम्हाला माहीत नाही का? मी फक्त 'मी ज्याला मानसिक गोंधळ म्हणतो' या एवजी 'तुम्ही ज्याला मानसिक गोंधळ म्हणता' असे म्हणायला हवे होते म्हणजे हे आपलेच वाक्य आहे हे तुमच्या लक्षात आले असते.

४) माझे विचार इंटरनेटवर लिहून माझे काहीही फावत नाही. मी माझ्या बाजूनी मला गवसलेलं सत्यं सोप्या शब्दात मांडतोय आणि ज्यांना माझं पटलंय त्यांना त्याचा उपयोग होतोय. तुम्ही माझी शिर्षकं वापरून ही मोहीम सुरू केलीय त्यामुळे तुम्हाला आता सावरणं जड जातंय.  

५) तुम्ही सारखा जो पुरावा मागताय त्याचं उत्तर मी माझ्या अठराव्या लेखात दिलं आहे. लिहीण्याच्या गडबडीत तुम्ही वाचायचं विसरताय. तुम्ही लेख मागे घेण्यापेक्षा शांतपणे सगळी लेखमाला वाचा. मला तुम्ही माघार घेतली या पेक्षा तुम्हाला निराकार समजला याचा जास्त आनंद होईल कारण तुमच्या आणि माझ्या बोधात फक्त एकच फरक आहेः तुम्ही स्वतःला देह समजता आहात आणि मी, आपण देह आणि विदेह एकाच वेळी आहोत हे जाणलंय.

संजय