आपण लेखावर टीका करायची सोडून लेखकावरच का धावून जाताय हे समजत नाही , शिवाय आपली प्रतिक्रिया ( लेख सोडून लेखकावर धाउन जाणे , विचार सोडून वैचारिकाला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणे  ) ही सर्व अध्यात्मिक लोकांची प्रतिक्रियेचे प्रतिक मानली तर , चार्वाकाचे काहीच साहित्य उपलब्ध नसणे , बौद्ध धर्मासारख्या विज्ञानवादी धर्माचे भारतात नामशेष होउन जाणे  वगैरे  गोष्टींचे व्यवस्थित स्पष्टीकरण देता येइल .


१) शरीर कसे आणि किती टिकू शकेल ?
>>>  किती टिकू शकेल> जितके टिकू शकेल तितके  आणि कसे टिकू शकेल > जसे टिकू शकेल तसे , थोडक्यात  अस्तित्व टिकवणे हे महत्त्वाचे आहे शक्य तितका काळ , जसे जमेल तसे !   आपण निसर्गाचे नीट निरिक्षण केले तर हेच आपल्या ध्यानात येइल  कोणताही जीव कधीच सहजा सहजी  शरीर टाकायला तयार नसतो , मग ते शरीर कसे का असेना किती ही जीर्ण विदीर्ण का असेना !

२) जर श्वास किंवा हृदय या सारख्या मूळच गोष्टी तुमच्या आवाक्या बाहेर असतील तर ते टिकवणे तुमच्या कितपत हातात आहे ?
>>>  "श्वास , हृदय या गोष्टी आपल्या आवाक्या बाहेर आहेत ,त्यामुळे शरीराचे अस्तित्व दैवाधीन आहे म्हणून अध्यात्माला लागा ! " ह्या तर्काने जर आपण अध्यात्माचा प्रचार करत असाल , तर काय बोलणार पुढे ??  भोळी भाबडया लोकांना  आपण जरुर भुलवू शकता युक्तीवादाने !! ह्या सत्कार्यासाठी शुभेच्छा ( देवू शकत नाही .. ) !!!


मला एक गोष्ट प्रकर्शाने जाणवते आहे , आपण कोठेही  रोखठोक पुरावा द्यायला तयार नाही , हा तार्किक द्रृष्ट्या आपल्या मताचा पराभव असला तरी  आपल्या पेक्षा मला त्याचे जास्त दुःख आहे .