परमहंस रामकृष्णांनी  " कट्टर नास्तिक " नरेंद्रला जसा पुरावा दिला तसा आपण देवू शकता का?? "

या  एका साध्या प्रश्नाच सरळ सोप्प उत्तर द्या

" हो " असं उत्तर असेल तर मला आपली दिक्षा घ्यायला आवडेल ,

" नाही "  असेल तर  
एकदा  " ह्या लेखना इतकाच माझा अनुभवही वैयक्तिक आहे  ,यातल्या कोणत्याही गोष्टीचा मी पुरावा देवू शकत नाही " असा डिस्क्लेमर द्या . बस्स .

  "
तुम्हाला आता सावरणं जड जातंय. " वगैरे वगैरे तुमच्या वाक्यांवरून  आपलं उत्तर हो असेल ह्याची शक्यता फार कमी आहे असे वाटते ,
 निराकार कळालेला कोणता माणुस त्याच्यावर झालेल्या टीकेने इतकाही व्यथित होत नाही .

रामकृष्ण परमहंस घश्याच्या कॅन्सर ने मृत्युशय्येवर पडले होते तेव्हा विवेकानंदांच्या मनात ( गुरुप्रेमामुळे ) विचार आला " हा माणुस स्वतःला देव समजल्याचा दावा करतो तर त्याच देवाची प्रार्थना करून स्वतःला वाचवत का नाही ??
तेव्हा रामकृष्ण म्हणाले " नोरेन , अरे जो राम , जो कृष्ण तोच मी रामकृष्ण , तुझा अजून कसा विश्वास बसत नाही ??"

 व्यथित होवून " पटत नसेल तर चालता हो " इतके वेळा सांगुनही तुला कळाले नाही कारण तू वरवर विचार करतोस , तू दगड आहेस " असं काही म्हणाले नाहीत .

" प्रचितीविण बोलणे । ते अवघेची कंटाळवाणे । जैसे तोंड पसरुनिया सुणे। भुंकून गेले॥ असे समर्थांनी म्हणले आहे .

असो . " परमार्थ असावा रोकडा । प्रचीतीचा॥ म्हणून बोललो , मन मोकळ करून  शंका विचारल्या ( युद्ध या विषयवर अजून काही शंका विचारायच्या होत्या पण ... ... )
  त्याचे अनुभवासहित उत्तर देता येत नाही , खंडन  करता येत नाही  याचा मला आपल्या पेक्षा ही जास्त खेद आहे .

कालच एका  जिवलगाने लेख वाचून , फोन करून सांगितले " तुझा ज्या काही शंका असतील त्या विरोपाने विचार . शिवाय

 " न बुद्धीभेदं जनयेत अज्ञानाम कर्मसंगिनाम ।
   जोषयेत सर्व कर्माणि विद्वान्युक्तः समाचरन ॥

म्हणून थांबतो .

कळावे .