देजावू म्हणजे घटना घडत असताना, हे अगदी असेच यापूर्वी घडलेले आहे असे वाटत राहणे. घटनेचा अनुभ लक्षात येण्यापूर्वीच ती घटना मेंदूत साठवली जाण्याने असे होते. म्हणजे एकाबाजूला 'घडतेय', ते मेंदूत साठवले जातेय, आणि आपण अनुभवतोय. असे घडतेय हे लक्षात येईपर्यंत मेंदूचे साठवण्याचे काम झालेले.. त्यामुळे 'अरे, हे तर असेच्या असे घडून गेलेले दिसते' असे वाटत राहते.
परंतु देजावू मध्ये 'काय व्हायचे राहीले आहे', किंवा अजून काय घडणार आहे ते मात्र काही केल्या समजत नाही (कारण ते मेंदूत साठवलेलेच नसते).
* जाणकारांनी अधिक प्रकाश टाकवा.
वरील गोष्टीत मात्र 'पौर्णिमेचा चंद्र' दिसणार आहे हे मेघनादला माहित होते.
हे सर्व खरच अविश्वसनीय आहे! असे होऊ शकते?