१) तुम्ही काय म्हणताय ते तुमच्या लक्षात येतंय का?

तुम्ही म्हणताय अमक्यानी तमक्याला जसा पुरावा दिला तसा तुम्ही मला देवू शकता का?

मी म्हणतोय तुम्ही स्वतःच तो पुरावा आहात. तुम्हीच शाश्वत आहात, तुम्हाला अनुभव नसला तरी तुम्ही सत्यं आहात ही माझ्या लेखमालेची सुरवात आहे पण तुम्ही वाचाल तर ना!

हा अनुभव तो अनुभव या मुळेच तर आपण स्वतःचं स्वरूप विसरलो आहोत आणि कुणी तरी आपल्याला ते दाखवेल या आशेवर आहोत.

तुमचा वैज्ञानिक दृष्टीकोन कसा मजेशीर आहे ते बघा. तुम्ही कोणीतरी सांगीतलेली गोष्ट प्रमाण मानता पण स्वतःच सत्य आहोत किंवा निदान असू शकतो, निराकाराचा वेध घेऊन बघू हे तुम्हाला पटत नाही. तुम्ही सत्यं शोधायची जवाबदारी स्वतःवर केंव्हा घेणार?

२) तुम्हाला शंका नाहीत तुमची ठाम मतं आहेत त्यामुळे तुम्हाला एक साधी गोष्ट लक्षात येत नाही की तुम्ही स्वतःला देह मानत असाल तरी तो साधा इकडून तिकडे चालण्यासाठी निराकाराची आवश्यकता आहे. एवढी साधी गोष्ट लक्षात आली तर आकार आणि निराकार मिळून अस्तित्व आहे आणि ते एक आहे हे तुमच्या ध्यानात येईल.

३) तुम्ही सरळ माझ्या विरुद्ध मोहीम उघडली आणि मी गप्प बसावं अशी वेंधळी कल्पना करत आहात. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हंटल होतं की माझं पटत नसेल तर तुम्ही तुमची लेखमाला सुरू करा. मी काही तुमच्या कल्पनेतला संत नाही त्यामुळे माझं तुम्हाला पटत नसेल तर वाचू नका कारण ते तुम्हाला समजेल असं वाटत नाही आणि मुख्य म्हणजे माझ्या शिर्षकांवर तुमचे लेख बेतू नका म्हणजे असे प्रसंग येणार नाहीत. तुमच्या जवळच्यानी जे तुम्हाला सांगीतले (व्य. नि. पाठव) ते मी माझ्या 'मी माझ्या लेखांवरचे काही प्रतिसाद उघडत देखील नाही' यात फार सुरुवातीलाच सांगीतले होते पण तुम्ही वाचाल तर ना!

संजय