माझ्याही आठवणी जाग्या केल्यात, धन्यवाद.

दादरला राम मारुती रोडच्या आमच्या प्राथमिक शाळेच्या (आतां त्या जागीं पोलीस स्टेशन आहे) बाजूला गंगाबाई कुलकर्णी मंडप ऊर्फ सी के पी हॉल आहे. त्याच्या बाजूला कर्मळांचीं आणि बिंबळांचीं झाडें होतीं. मोठीं मुलें कधीं कधीं आम्हां दुसरीतिसरीतल्या छोट्यांनाही देत.

दादर पश्चिम रेलवे आणि दादर मध्य रेलवे यांच्या मध्यें टिळक पुलावरून उत्तरेला उतरलें कीं एक मालगाडीचा धक्का आहे. तिथें गर्द राई होती. जांभळें, कर्मळें, बिंबळे, रायआवळे, चिंचा, बोरें, विलायती चिंचेचीं झाडें होतीं. मुख्य म्हणजे तिथें मानकाप्या (भुताचा एक प्रकार) आहे अशी वदंता होती, त्यामुळें आम्हीं घाबरट मुलें जात नसूं. पण हा रानमेवा इतका विपुल असे कीं आमचा दादा आणि त्याचे  टगे मित्र भरपूर खाऊन खेळून झाल्यावर खिसे भरभरून घरीं आणीत.

सुधीर कांदळकर