पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
गावात आलेल्या चोरांना गावकऱ्यांनी पिटाळून लावल्याच्या अनेक घटना पहायला मिळतात; मात्र प्रत्यक्ष चोरी करीत असताना गावकऱ्यांनी चोरांना जागीच पकडून ठेवून पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटना विरळाच. नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा या गावात नुकतीच अशी घटना घडली. सुट्टीवर आलेल्या गावातील दोघा लष्करी जवानांच्या धाडसाने आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे चोर पकडला गेला. त्याबद्दल या सर्वांना शाब्बासकी दिलीच पाहिजे. एवढेच नव्हे, तर त्यांचा यथोचित गौरवही झाला पाहिजे. त्यातून इतरांना प्रेरणा मिळू शकेल.