म्हणजे उत्तर न देतां न दुखवतां तस्सेच प्रतिप्रश्न विचारावेत. एवढ्या सकाळीं इथें काय करतां, घरीं कामें नाहींत कां, सासूबाईंनीं सांगितलें आहे कीं ओणालाही परक्या माणसाला पगार सांगायचा नाहीं.
काका : लेकीने... पोरांनी च्या दिला की न्हाई तुला...
यावरून काय तें समजलेंच. अडाणीपणा गृहीत धरला तरीही नसत्या भोचकपणाचें समर्थन होत नाहीं.
असो. प्रसंग ओघवत्या भाषेंत छान वर्णन केला आहे. डोळ्यांसमोर चित्र उभें राहिलें. मुख्य म्हणजे वरील एका प्रश्नांत आजीबाईंची अगतिकता आणि सध्यांचा वृद्धसंगोपनाचा सामाजिक प्रश्न मांडला आहे.
सुधीर कांदळकर