माझे रामायण येथे हे वाचायला मिळाले:
मारीचाने मरताना मारलेल्या आर्त हाका लक्ष्मण व सीता यांना ऐकूं आल्या त्याअर्थी मारीच व राम फार दूर गेलेले नव्हते. मारीच मेल्यावर रामाला शंका आली व म्हणून तो घाईघाईने परत फिरला. हाका ऐकू आल्यावर लक्ष्मण व सीता यांच्यात बराच वादविवाद झाला व अखेर नाइलाजाने लक्ष्मण निघाला यांत काही काळ गेलाच. लक्ष्मणाला राम वाटेतच भेटला व दोघे घाईने परतले. लक्ष्मण निघून परत येईपर्यंत थोडाच वेळ गेला असणार. ...