जुन्याच घटना कुणी कधीचे, इथे तपासत बसले आहे
जुन्याप्रमाणे नवीन येथे, कधी तरी का घडले आहे?
- छान.
खुशाल मोठा धरून दाणा, समोर बसली खारूताई
मिटून डोळे हळूच मागे, लबाड मांजर टपले आहे
- फारच छान.
रिमझिमणारे तुषार झेलून.. तहानलेली उरते माती..
विरून शपथा, सरून प्रीती तशीच आता उरले आहे
- वा... वा...
’तुझाच मी" अन ’तुझीच मी "च्या सुरूच त्यांच्या आणाभाका...
जरी मनाला असत्य आहे कुणीतरी हे.. कळले आहे..
(असत्य आहे कुणीतरी, हे जरी मनाला कळले आहे.. )
- चांगला