खूप वर्षांनी ऐकला हा शब्द ... मजा वाटली. कोण लक्ष देतोय, कुठले शब्द वापरावे ते ? आपल्यालाच मराठी शब्द माहिती नाही तर उगाच इंग्रजीच्या मागे का लागावे ? "ब्लॉग"ला अनुदीनी म्हणून त्याचं स्वरुप बदलणार आहे का ? असो. टिव्ही बघताना त्याला "टिवी" म्हणून बघितला तर काय फरक पडतो, असा विचार करणारी साधी माणसं, त्यांचं काय ?

तांत्रिक शिक्षणात उगाच अनुवाद करू नये, असं मला वाटतं. त्रास होतो पुढे. आधी संस्कृतजन्य मराठी शिका आणि नंतर इंग्रजी आहेच, मग उगाच हा "द्राविडी प्राणायाम" कशाला?

बाकी, भाषा शुद्धी म्हणजे काय? पुणेरी किंवा संस्कृतोद्भव वापरणे ? मग खानदेशी, वऱ्हाडी, मराठवाडी, मालवणी, यांचं काय?