लय न सापडल्याने, किंवा लय नसल्याने या गझलेच्या निमित्त्याने जी चर्चा झाली ते बरेच झाले. 

मी लिहितांना उद्धवाच्या दोन ओळी एकत्र अशी लय मनात ठेवून लिहिले होते.. असो पण त्यात सुधारणेला वाव नक्कीच आहे.

एकंदर मी  चालक शिकत आहे चा बोर्डे कायम बरोबर बाळगणार असे दिसतेः)
चर्चा , टीका, सुचवणी, कौतुक , शंका हे सर्व लेखनाची दखल घेण्याचे वेगवेगळे पण   तेवढेच आवश्यक  आणि उपयुक्त असे मार्ग आहेत. आपापल्या व्यापातून वेळ काढून गझलेला  प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.
सोनाली